Thursday, August 8, 2013

माझे निस्वार्थ प्रेम तुझ्याच चरणी ......

तीने दिलेल्या सर्व आठवणी पुसण्याचा प्रयत्न करतोय,
स्वतःपासुन खुप दूर  जाण्याचा प्रयत्न करतोय......!!

मला माहीत आहे,
तिला मनातुन काढुचं शकत नाही.....
कितीही प्रयत्न केले तरी,
कधीचं विसरु शकत नाही.....!!

मला माहीत आहे,
मी तिला फक्त मनस्ताप दिलाय ....
पण तिला फक्त मनस्ताप देताना,
मला मनस्ताप झाला असेलच ना ....!!

आजही मी तीच्यासाठी गप्प आहे,
माझ्यातला प्रत्तेक क्षण ठप्प आहे,

का कुणाचं ठावूक ?
का कुणाचं ठावूक ?

तिच्यासाठी वेचलेले शब्द,
तिच्यासाठी वेचलेले प्रत्येक क्षण,
माझ्यातली ती ,
आणि तीची आठवण ,
हे सर्व तिचंच तर आहे...

अजूनही हा खेळ मला खेळायचा आहे,
आठवणींचा पुरा,
इंद्रधनुंच तीच्यावर ओवाळायचा आहे,
वदलो नाही मी तरि,
वदतील माझी गाणी ,
असचं अखंडित उधळीत राहिन,
माझे निस्वार्थ प्रेम तुझ्याच चरणी ...... 
                                                               आनन म्हात्रे ....

No comments:

Post a Comment