Monday, August 26, 2013

मृत्यूंजय कादंबरी प्रतिक्रिया

मृत्यूंजय ! मृत्यूंजय !  आणि फक्त मृत्यूंजय !
खूप दिवसापासून मृत्युंजय बद्दल बऱ्याच मित्रांकडून ऐकायला मिळाल होत. त्यामुळे नकळतच ह्या पुस्तकाबद्दल एक वेगळा आकर्षण तर होतंच  पण कधी तसा  पुस्तक हाती लागण्याचा योग कधी येत नव्हता , कदाचित पुस्तक वाचण्याबद्दलचा कंटाळा त्या गोष्टीकडे झुकवत नव्हता . जे काही वाचायचं ते इंटरनेट माध्यमातून वाचत होतो त्यामुळे कधी पुढाकार  हि घेत नव्हतो . अश्यावेळी अचानक हे पुस्तक माझ्या घरी २ महिन्यापूर्वी  स्वताहून चालून आलं  होत . पण दुर्भाग्य असं होत कि त्यातच परीक्षेमुळे  मी त्या स्पर्शही करू शकत नव्हतो.  डोक्यात खंत होती परीक्षा संपेपर्यंत हे पुस्तक माझ्या रूमवर राहण्याची; कारण हे पुस्तक  माझ्या मित्रांनी मिळून घेतलं होत व ते पाळ्या-पाळ्यांनी  वाचत होते आणि  त्या ग्रुप मध्ये माझा सहभाग नव्हता .
पण दैवाने  ते माझ्यासाठी आणून ठेवलं होत असं मला वाटत .
कालच आठवड्याभरापूर्वी वाचायला घेतलेली "मृत्युंजय" हि कादंबरी कालच पूर्ण केली .
"मृत्युंजय "शब्द ओठावर आला की "कर्ण "!!
"कर्ण " शब्द आला कि "वसु " !!
"वसु "नाही?..... "सूतपुत्र  कर्ण" !!
"सूतपुत्र  कर्ण" नाही ?......."अंगराज कर्ण" !!
नाही ?....."सूर्यभक्त कर्ण " !!
नाही ?....."वीर धनुर्धर कर्ण "!!
नाही ?....."दिग्विजय कर्ण "!, "सूर्यपुत्र "!, "राधेय"! , कौतेय! .....नाही " दानवीर कर्ण " !!!!

कोण होता तो ?
मित्रांनो , तुम्हाला खर सांगायचं झाल तर कोणत्या शब्दात तुमच्या पुढे सांगू खरचं प्रश्नचिन्ह आहे ....
कादंबरी संपता संपता काळ रात्री ३ कसे वाजले होते मला समजलंच नाही..
अंगावर रोमांच्याचे शहारे झळकत होते ...नकळत अंग थरथरत होत ....
पुस्तक संपता संपता नकळत दोन्ही डोळ्यात अश्रू कधी डबडबले समजलं हि  नाही ... 
साक्षात श्रीकृष्णाच्या मुखातून त्या महावीराचा महानिर्वाणाचे  दृश्य मी समोर प्रत्यक्षात अनुभवत होतो....
अगदी मारणाच्या दारात आपली दानशूरता अक्षय ठेवणारा, परम मधुसुदानाच्या डोळ्यात पाणी आणणारा, मैत्रीसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा , एका जन्मदात्या  मातेला दिलेल्या वाचनासाठी प्रतीस्पर्धी  युधिष्टर , भीम , नकुल आणि सहदेव ह्यांना रानागणात  जीवनदान देणारा, रथ दलदलीत फसणार ह्या शापाने शापित असताना आपल्या सारथी शाल्ल्याला हसत हसत दलदलीत टाकण्याचा आदेश देणारा , अगदी शेवटच्या घाटकांमधे अर्जुनाला संभ्रमित करणाऱ्या कृष्णाच्या कडे हसून कटाक्ष देवून प्रणाम करणारा ,,,,,, कोण होता तो ?
तो फक्त एकाच मृत्यूला कुरवाळून अमर ठरलेला एक "मृत्युंजय कर्ण ".......

खरच !  कै . शिवाजी सावंत ह्याचं कोणत्या शब्दात मी आभार मानु  मला खरच कळत नाही ... त्यांच्या शिवाय हा असा कर्ण कधीच माझ्या समोर उभा ठाकला नसता .....खर तर महाभारतील त्यांच्या प्रत्येक पत्रान मला भारावून टाकलय ...पण सर्वात श्रेष तो एकच , अगदी श्रीकृष्णाहून हि श्रेष्ठ  असा तो  "कर्ण ".........
                                                                                                                                        आनन म्हात्रे ....

No comments:

Post a Comment