Monday, August 26, 2013

प्रतिक्रिया

मला एक नेहमीच आवडलेली गोष्ट  म्हणजे  एखाद्याच्या ब्लॉग  वर दिलेल्या मजकुराबाबत प्रतिक्रिया देणे , हा विषय माझा नेहमीचा आवडीचा वाटतो . असेच  प्रतिक्रियांचे  चर्चासत्र  सतत चालू हे असतातच पण  नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट बालक-पालक  चित्रपटा बद्दलच्या  मत प्रदर्शना वर झालेले चर्चासत्र …


Anan Mhatre

मित्रा तुझं लिखाण मला नेहमीच आवडलंय पण पण प्रतीक्रियेने कधी व्यक्त केल नाही , म्हणजे मी जरा कंटाळाच केला ....पण ठीक आहे आहे त्याबद्दल मी मनापासून  दिलगिरी व्यक्त करतो ..मला मनापासून निशिगंध , पैलतीर ह्या कादंबर्याचा उल्लेख करायला आवडेल...
पण , आजच्या तुझ्या ह्या विषयावर प्रतिक्रिया अवूर्जुन द्यायची इच्छा होत आहे ....
पहिल्यादा तर तुझ्या आकलानाची  मी दाद देईन , खरच तुझ व्हिजन खूप छान आहे,,,
ये पण मनापासून सांगतो कि मला नाही वाटत कि दिग्दर्शक रवि जाधव यांचा प्रबोधन करण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय .
 अव्या  या व्यक्तिमत्वाच्या त्याने आपल्या मुलाच्या  कानाखाली मारण्याच्या प्रसंगावरून तू संपूर्ण चित्रपट अपयशी ठरव्लास.
खर तर मला इथ तुला आवर्जून सांगावस वाटेल इथे दिग्दर्षानामाध्ये कोणतीच चूक रवि जाधव ह्यांनी केली नाही ...
माझ्या मते , दिग्दर्शकाला इथे असा दाखवायचं होत कि अव्य ह्या व्यक्तिमत्व त्याच्या आयुष्यात गुंग झालेला दाखवून हा विषय त्याच्यापुढे अकस्मात समोर आलेला दाखवलाय ज्याची त्याला कल्पनाही नव्हती ,  आणि ह्या  प्रसंगी  तो आपल्या मुलाच्या कानाखाली आवाज काढतो ....इथे दिग्दर्शक माणसाकडून होण्यार्या दुर्लक्षाची  जाणीव करून देतो ....
पण , त्यानंतर अव्याला झालेली जाणीव हि तो भूतकाळात घटनांनी करवून देतो .
आणखी म्हणजे हे प्रसंग कश्या प्रकारे  हाताळले पाहिजे हे आजोबांनी तिलेल्या मार्गदर्शनाच्या प्रसंगाने  पूर्ण होत त्यामुळे तो अव्याच्या द्वारे करण्याची दिग्दर्शकाला गरज वाटली नसावी...... एव्हाना ती मला हि वाटली नाही ....पण ती  अव्याच्या शेवटच्या डायलॉग ने पूर्ण होते....." मुलांना काय फक्त त्यांच काय हे दाखवण्या  पेक्षा  काय बरोबर आहे हे दाखवले पाहिजे "
तसेच अव्या आणि डॉली  ह्याच्या जोडीने इथे आकर्षणाला हि दुजोरा दिला नाही .....

ह्यापेक्षा आधीक तुला काय सांगाव...अश्या प्रकारच्या संवेदनशील विषयावर बालक -पालक ह्यांच्या नात्यांना सागड घालणारा प्रयत्न मला खूप आवडला मला तर हि काळाची गरज आहे अस वाटल त्यासाठी मी रवि जाधवांचं मनापासून आभार मानेन आणि त्याच प्रभोधन माझ्यापर्यंत  तर अचूक पोहचल अस मला वाटत .....

Deepak Parulekar:

प्रिय आनन,

सर्वात प्रथम माझं इतकं कौतुक केल्याबद्दल खूप आभारी आहे. फार बरं वाटलं इतकी स्तुती ऐकून :)
आता सिनेमाविषयी, तुझं आकलन ही बरोबर आहे. की अव्याअ नेहमीच्या व्यापात आणि आयुष्यात गुंग असताना अचानक मुलाच्या त्या पराक्रमाने विचलित होतो. पण किती वेळ?
चल आपण मान्य करु की पॉर्न डीव्हीडीज मुलाकडे सापडल्यामुळे फर्स्ट रिअ‍ॅक्शनने तो हात उगारतो. नंतर वैतागतो आणि बाहेर जातो. बायकोला ही त्याच्य फ्रस्ट्रेशनने सगळं सांगतो. यात किती वेळ गेला?
या इतक्या वेळात त्या पॉर्न डीव्हीडीज मुलाकडे बघून त्याला आपलं बालपण का आठवत नाही. कारण वयाच्या त्या नाजुक वळणावर त्याने ही ते सर्व केलेले असतं आणि ते ही खूप पुढे जाउन. इतका मोठा प्रसंग त्याच्या आयुष्यात घडतो.
आपले आईवडील आपल्या प्रशांची उत्तरे देउ शकत नाही हे त्याला माहित असतं. मग त्याच्यासारख्या हुशार मुलाने आयुष्यात काय धडा घ्यायला हवा होता?? त्याच्या त्या रिअ‍ॅक्शन अम्धून मला तर असंच वाटलं की त्याने तीच जुनी पिढी पुढे चालवली आहे.
निदान डॉलीच्या चेहर्‍यावर ते सगळं दिसतं आणि तिला वाटं की आप्ण आपल्या मुलासाठी काही तरी करायला हवं. पण अव्याच्या चेहर्‍यावर तसं काहीच दिसत नाही.
चित्रपटाने प्रबोधन करायलाच हवं हा माझा हट्ट नाही. तुझं आकलन अगदी बरोबर आहे पण अव्याच्या आणि डॉलीच्या शेवटच्या प्रसंगातून जे तू उचललंस आणि जे तुला योग्य वाटलं तेच सगळ्यांना वाटलं असं नाही ना.
कारण बाकिचे लोक फक्त त्या मुलांच्या स्टोरीवर टाळ्या वाजवतात. हसतात, शिट्ट्या मारतात. कारण त्यांना जे हवयं ते दिग्दर्श्क त्यांना त्या मुलांच्या स्टोरीतुन दाखवतो. खरं सांगतो हा सिनेमा बघुनही आपल्या पालकांच्या मनात काही प्रकाश पडेल असं कधीच नाही होणार. प्रतिक्रियेकरता पुन्हा धन्यवाद.
असाच लोभ असावा.

दीप्स

Anan Mhatre

दीपक,
मित्र तुझ्या एका म्हणण्या बद्दल नक्कीच सहमत असेन कि माझ किव्वा तुझ मूव्ही बद्दलच जे आकलन आहे ते सर्वांचे  असेल असं नाही आहे , कारण मला ही जी  गोष्ट प्रकर्षाने थेटर मध्ये जाणवली , ज्या टर्निंग पॊइन्ट वर ( जेव्हा ती मुलं B P  बघतात ) त्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे बदल व विषयाचे गाभिर्य ह्या गोष्टी बर्याच लोकांच्या बुद्धीपालिकडच  आहे असाच मला जाणवलं , कारण त्यानंतरचे प्रसंग हे मुळीच हात्स्यावारी घेणारे मुळीच नव्हते  ...
पण , तो दिग्दर्शकाच अपयश आहे किव्वा त्या सिनेमाच  अस मला मुळीच वाटल  नाही  मला तो लोकांचा अपयश वाटला  ...
दुसरी गोष्ट तू जे आव्याच्या panic reaction  बद्दलचा आणि वेळ गेल्याचा उल्लेख केलास त्याच्याबद्दल मला अस वाटलं , तिथे मी जे म्हणल्याप्रमाणे त्याच्या ह्या अश्या अनपेक्षितपणे अचानक आलेल्या प्रसंगावरून झालेलं दिग्दर्शकाला दाखवायचं होत अस मला वाटत; तसेच तो बाहेर येतो व डॉलीला  झालेल्या प्रकाराबद्दल सांगतो त्यामुळे त्यागोष्टी आव्या आणि डॉली ह्यांच्या दोघांच्या हि आयुष्यात घडल्या होत्या हे रवि जाधव यांना दाखवायचं होत त्यामुळे तो प्रयत्न केला असावा . तसेच त्या panic स्वभावात तो आपल्या मुलाला मारतो त्याच्या अर्थ जुनी पुढी पुढे नेण्याचा होत नसून ह्या गोस्तीकादाच पालकाच दुर्लक्ष दाखवण्याचा प्रयत्न केला अस मला वाटत . पण त्यानंतर झालेली जागरूकता तिथे दाखवली गेलेली आहे. हा तो प्रश्न आव्या आणि डोली ने  कसा हाताळला हे त्यांनी दाखवला गेल नाही , पण त्याची मला गरज वाटली नाही कारण असा प्रश्न कसा सावरावा हे भूतकाळात दाखवला गेलेला आहे.......
त्यामुळे एवढ्या कारणामुळे सिनेमा आपटणे हे मला पटत नाही आहे ...
चित्रपटाने प्रभोदन करणे हा हट्ट कधीच नसावा पण चित्रपटातून नकळत काहीतरी पाभोदन व्हाव अशी अपेक्षा मी नक्कीच ठेवेन  .....
प्रतिसादासाठी धन्यवाद !!
आनन म्हात्रे ...

No comments:

Post a Comment