स्वप्निल मी पाखरू ,
स्वप्नपरी तू असशील का ?
आयुष्याच्या वेडया वळणावर ,स्वप्नपरी तू असशील का ?
साथ तुझी देशील का?
श्वासात माझ्या भास तुझे गं,
चित्त गहिवरे क्षणों-क्षणी ,
खिन्न निराशा भासता मनी,
आशा किरण तू होशील का ?
स्वप्निल मी पाखरू ,
स्वप्नपरी तू असशील का ?
मी निरागस वाटसरू गं,
पथ चकवा मार्ग हा ,
जाणवता झलाया उन्हाच्या ,
गर्द निळी सावली तू होशील का ?
स्वप्निल मी पाखरू ,
स्वप्नपरी तू असशील का ?
सांग सखे सांग,
तू असशील का ?
सांग सखे सांग,
स्वप्नपरी तू असशील का ?
...... आनन म्हात्रे
No comments:
Post a Comment