Tuesday, August 7, 2012

अगदी माझ्यासारखं.......


ते बघं, ते  माळरान ,
एकटं, 
सताड,
उदास आणि ओसाड ,
अगदी माझ्यासारखं.......

होता एके वेळी  इथे  प्रेमाचा गारवा,
चालत होता मग पान-फुल अन पक्ष्याचा मारवा,
होती इथे एक,
अनोखी पहाट,
स्वच्छंदी मी अनं तो चिवचिवाट,
पण, तुझे ते शब्द झाले गोफण   
आणि सर्व निस्तब्ध,

हरवलंय सर्व!  हरवलंय सर्व!  ते  फक्त एका दवबिंदूसारखं ,
ते बघ, ते  माळरान ,
अगदी एकटं,
अगदी सताड,
उदास आणि ओसाड ,
    अगदी माझ्यासारखं.......

कोरडलंय आभाळ  सारं,
भेरड्लीय धरणी,
सगळं कस निखळ आणि सुंदर सारं ,
का व्हावी तुझ्याकडून करणी,
सोसतोय !
सोसतोय!  असहनीय ,
 कठोरता उन्हाची ,
अनं त्या निर्दयी वाऱ्याची , 

बघ  ना!  बघ ना! काळ  कसा सरतो आहे,
तुझ्यासाठी चातक हा ,
कधीचा  झुरतो आहे,
बिथरलीत सर्व!  बिथरलीत सर्व!  स्वप्न एखाद्या माणिकमोत्या  सारखं,,
ते बघ, ते  माळरान ,
अगदीचं  एकटं,
अगदीचं  सताड,
उदास आणि ओसाड ,
      अगदी माझ्यासारखं.......

                                                                                                  .....आनन म्हात्रे  

No comments:

Post a Comment