इवलंस शर्ट ते ,
वितभर प्यांट,
इवलंस शर्ट ते ,
वितभर प्यांट,
मॊजमस्ती दिवसभर,
नसे कधी शांत,
प्रत्येक वेळी दंगा आपला ,
सगळ्याशी पंगा आपला,
हा! हा! हा! ... काय लाईफ होती साला ,
ती फक्त एक शाळा .....
ती फक्त एक शाळा .....
आठवतो का तुम्हा?
तो "बे " चा पाढा,
अन तो मजेशीर.
बालभारतीचा धडा,
अ आ इ ई ,
क का कि की ,
अन ती बेरीज,
वजाबाकी ,
हा! हा! हा! ... काय यार लाईफ होती साला ,
ती फक्त एक शाळा .....
ती फक्त एक शाळा .....
आठवतो का तुम्हा?
तो छडिचा मार,
सगळ्यासमोर वाटत असे,
मग आपलीच हार,
जरी असायचे हे दुखावनारं ,
क्षणात सारं विझणारं ,
हा! हा! हा! खरंच ना! काय लाईफ होती साला ,
ती फक्त एक शाळा .....
ती फक्त एक शाळा .....
.... आनन म्हात्रे
No comments:
Post a Comment