पाडवा, पाडवा ,
गुढी पाडवा,
सद्-भावनेनं तुम्ही, प्रेम मनी वाढवा.
वर्ष नवे हे तारुण्याचे ,
उजळवू दिप मनी प्रेमाचे ,
अनुबंधाचे हे जोडूनी नाते ,
आपुलकीचा भाव मनी वाढवा ,
पाडवा पाडवा ,
गुढी पाडवा .
सद्-भावनेनं तुम्ही, प्रेम मनी वाढवा.
वर्ष नवे हे करुणाईचे,
जपू अस्तित्व त्या प्रत्येक नात्याचे
जपू अस्तित्व त्या प्रत्येक नात्याचे
नवर्ष्याचे सुंदर क्षणी,
नवआकांक्षांच्या उभारून गुढी मनी ,
पसरवू आनंदाचा गोडवा ,
पडावा पाडवा ,
गुढी पाढवा,
सद्-भावनेनं तुम्ही, प्रेम मनी वाढवा.
...... आनन म्हात्रे
No comments:
Post a Comment