मधुमस्त धुकं,
मधुमस्त धुकं अनं एकच कटिंगचा प्याला,
रिमझिमता पाऊस अनं पाघोळ्यांचा बेधुंद सोहळा ....
मधुमस्त धुकं अनं एकच प्रवास,
सरसरता वारा अनं तुझ्यासाठी घेतलेला तो एकच स्वास.....
मधुमस्त धुकं अनं एकच गंध,
रोमरोमात दाटलेली तु अनं तुझा तो एकच ऋणानु बंध....
मधुमस्त धुकं अनं एकच आठवण ,
जाणीवपूर्वक जतन करुन ठेवलेली तुझी ती एकच साठवण.....
मधुमस्त धुकं अनं एकच आस,
जवली तु नाहीस पण फ़क्त तुझा एकच भास.....
...... आनन म्हात्रे